____________________________________
Copyright © 2025 नित्यानंद नवग्रह ज्योतिष मार्गदर्शन
आता आपण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात पोहचलो आहोत. गेली काही दशकं आपलं जीवनमान अत्यंत वेगाने बदलताना आपण पाहिलं आहे. पुढेही ह्या बदलांचा वेग असाच असणार आहे; किंबहुना, तो वाढत राहणार आहे. ह्या सातत्याने होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणं, हे आपल्या सर्वांसाठीच एक मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलताना, आपल्यासमोर नवनवीन अडचणी उभ्या राहतात. मग त्या वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो किंवा कार्यक्षेत्रातील असोत. बऱ्याचदा आपल्या अडचणी या, ह्यापलिकडे जाऊन अतिशय नाजूक आणि तितक्याच व्यक्तिगत पातळीवर उद्भवतात. अशावेळी कित्येकदा, आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. असं मार्गदर्शन, जे आपल्याला या अडचणींच्या मुळाशी जायला मदत करेल; त्रास नेमका ग्रहस्थिती दर्शवते? की आपलीच विचारसरणी/दृष्टिकोन यामुळे आपल्याला त्रास होतो? व दोन्हीं पैकी काहीही किंवा दोन्हीही असल्यास, त्यातून चांगला मार्ग कसा काढणार? या सर्व गोष्टींबद्दल “नित्यानंद नवग्रह ज्योतिष” हे आपले मार्गदर्शन केंद्र, गेल्या नऊ वर्षांपासून या अडचणी निवारणाच्या मार्गदर्शन हेतूने कार्यरत आहे.
या केंद्रात मार्गदर्शन करताना, अडचणींचा प्रॅक्टिकल दृष्टीने देखील तितकाच विचार केला जातो. अडचणींच्या/प्रश्नांच्या विविध बाजू लक्षात घेऊन, एक सर्वांगीण मार्गदर्शन येथे केले जाते. ज्योतिष शास्त्राचा ‘एक पुरातन विज्ञान’ म्हणून अभ्यास करणे आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे, ही आजच्या काळाची गरज आहे. ही गरज ओळखून, आपल्या या केंद्रात सर्व मार्गदर्शन केले जाते.
समग्र ज्योतिष शास्त्राचे काही उपविभाग आहेत. जसे की वैदिक ज्योतिष शास्त्र , नक्षत्र ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र , हस्तसामुद्रिक शास्त्र , कृष्णमूर्ती पद्धती, होरा ज्योतिष, अष्टकवर्ग पद्धती इत्यादी. हे सर्व उपविभाग मार्गदर्शनाच्या विविध पद्धतींमध्ये येतात. या केंद्राचे मार्गदर्शक, श्री. सुदर्शन श्रीहरी महाजन गुरुजी यांचा, ज्योतिषशास्त्राच्या या विविध कंगोऱ्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सातत्याने सुरू असून, त्यांच्याकडे ज्योतिष शास्त्र विभागातील-
ह्या पदव्या आहेत. तसेच त्यांच्याकडे,
ह्या व मार्गदर्शनासाठी उपयुक्त अश्या विविध विषयांचे सर्टीफिकेशन्स आहेत. सध्या ते ह्यातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
कामातून येणाऱ्या अनुभवाची नोंद करून, त्यात सातत्याने संशोधन करणे, हे नित्यानंद नवग्रह ज्योतिष मार्गदर्शन केंद्राचे वैशिष्ट्य आहे. या संशोधनाचा फायदा, हा वेळोवेळी अचूक व योग्य फलादेश वर्तवण्यात होतो. श्री.सुदर्शन महाजन हे गेली नऊ वर्षे सातत्याने ज्योतिष विषयक मार्गदर्शन करत आहेत. तसेच, मार्गदर्शनंतर देण्यात येणाऱ्या उपायांच्या होणाऱ्या प्रभावावर, त्यांचा सातत्याने अभ्यास सुरू असतो.
नित्यानंद नवग्रह ज्योतिष केंद्रात मार्गदर्शन प्राप्तीसाठी येणारे सर्व सज्जन, हे येथील मार्गदर्शनाच्या पद्धतीने संतुष्ट आहेत. आमच्या येथील मार्गदर्शन हे फक्त “एक शास्त्र काय सांगते?” यावरच भर देत नसून, त्यासोबतच समोरील व्यक्तीची त्या त्या वेळची परिस्थिती, त्यांची मन:स्थिती, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यासमोर असलेले विकल्प, या सर्व गोष्टींचा (याही विविध शास्त्रांचा) चौफेर विचार/अभ्यास करून, मार्गदर्शनाचा आराखडा तयार केला जातो व त्यानुसार मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनानंतर, (जातकाने विचारल्यास व खरंच आवश्यकता असल्यास) योग्य ते उपाय/उपासना/विधी/रत्न/यंत्र/Remedies इ. सुचविले जातात.
नित्यानंद नवग्रह ज्योतिष मार्गदर्शन केंद्राचे संपूर्ण कामकाज, हे शास्त्रोक्त, अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवांच्या (फलादेश व Result Oriented उपायांच्या) आधाराने होते. त्यामुळेच, येथे मार्गदर्शनासाठी येणारे सर्व जातक बंधू-भगिनी हे संपूर्णपणे संतुष्ट असल्याची पुष्टी देतात.
यामुळे, मार्गदर्शनाची आवश्यकता असलेल्या जास्तीत जास्त जातकांपर्यंत पोहोचून आम्हाला सेवा प्रदान करण्याची संधी लाभावी व शास्त्राबद्दल आदर असलेल्या सर्वांनीही या सुविधांचा लाभ घ्यावा म्हणून, आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना आपले उत्तम प्रतिसाद मिळावेत अशी इच्छा कृष्ण चरणी व्यक्त करतो आणि थांबतो..!